Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज मंगळवार
7 ऑक्टोबर 2025


Min Date -

Max Date -

Word Search -

रद्द झालेले कार्यक्रम -

क्षेत्र(शहर)

venueName :


   

रविवार
7 ऑगस्ट 2022
04:00 पहाटे
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक, पीएमपीएमएल व प्रवासी हित
सहभागी-वाहतूक तज्ञ सौ प्रांजली देशपांडे, विवेक वेलणकर,संजय शितोळे व कार्यकर्ते
.
पुणे शहरातील मोठ्या प्रमाणात वाढलेली वाहतूक कोंडी, प्रदूषण हे सर्व पुणेकरांना आता नित्याचेच व सवयीचे झाले आहे. शहरात असलेली एकुलती एक सार्वजनिक वाहतूक सेवा पी एम पी एम एल ,ही पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिकांना आपलीशी वाटते आहे का? नागरिक पी एम पी एम एल प्रथम क्रमांकाचा वाहतूक पर्याय म्हणून स्वीकारतात का? पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण यावर उपाय काय?
सार्वजनिक वाहतूक सक्षम, सुरक्षित व भरवशाची व्हावी यासाठी राजकीय आणि प्रशासकीय धोरणे उद्दिष्टे ही प्रवासी हिताची आहेत का?
प्रवाशांचे अनुभव कथन, तसेच दर्जेदार‌ भरवशाच्या सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी काय करता येईल यावर विचार विनिमय करण्यासाठी सजग नागरिक मंच व पीएमपी प्रवासी मंचा तर्फे हे चर्चासत्र आयोजित केले आहे.
हे चर्चासत्र सर्वांसाठी खुले आहे पीएमपीएमएल प्रवासी व पुणेकर नागरिक यांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि या सेवे संदर्भातले आपले अनुभव कथन करावेत.
आयोजक-सजग नागरी मंच आणि पीएमपी प्रवासी मंच